मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !

आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

नॉर्वेमध्ये ‘फायझर’ची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांपैकी १३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत देशात ३३ सहस्र लोकांपैकी २९ लोकांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यांतील २३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात १३ जणांचा लसीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ‘रायटर’ महिलेला ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान !

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले.

संभाजीनगर येथे बनावट मतदान करण्यासाठी आलेले तिघे जण पोलिसांच्या कह्यात

मयत भास्कर जयाजी ढोले (वय ६२ वर्षे) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आली होती. त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्र होते. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.

सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !