
जळगाव – जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले; पण असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला. काही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रावर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर इतर पॅनलच्या उमेदवारांनी हरकत घेतली. पोलिसांनी उमेदवारांना सांगूनही ते मतदान केंद्राबाहेर जात नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. लाठीमारानंतर उमेदवार मतदान केंद्रातून बाहेर पडले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !