नॉर्वेमध्ये ‘फायझर’ची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांपैकी १३ जणांचा मृत्यू

ओस्लो (नॉर्वे) – नॉर्वेमध्ये ‘फायझर’ आस्थापनाची कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत देशात ३३ सहस्र लोकांना लस टोचण्यात आली आहे. यात एकूण २९ लोकांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यांतील २३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात १३ जणांचा लसीमुळे मृत्यू झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

उर्वरित लोकांच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे. यांतील बहुतेक जण वृद्ध होते, तर अनेकांना विविध आजार होते. त्यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.