खाणीतून नागपूरच्या खासगी आस्थापनाच्या नावे निघालेल्या कोळशाची दुसरीकडेच विक्री
निलजई खाणीतील कोळसा नागपूरच्या प्राईड मेटल आस्थापनाच्या नावे पाठवण्यात आला; मात्र तो लालपुलीया येथील व्यापार्यांना विकला गेला. ७२ टन कोळसा, तसेच ३ ट्रकसह ७ जण कह्यात.
निलजई खाणीतील कोळसा नागपूरच्या प्राईड मेटल आस्थापनाच्या नावे पाठवण्यात आला; मात्र तो लालपुलीया येथील व्यापार्यांना विकला गेला. ७२ टन कोळसा, तसेच ३ ट्रकसह ७ जण कह्यात.
शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही भाजपने संबंधित आदेशाचे पालन न करत आंदोलन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे.
कृती समितीने उपस्थित केलेल्या अनेक सूत्रांवर साहाय्यक संचालकांनी ‘निधी नाही, मनुष्यबळ अपुरे आहे’, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पुराव्यांसह अतिक्रमणांविषयी माहिती दिल्यावर साहाय्यक संचालक निरूत्तर झाले.
ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये सरकारी अधिकारी अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जनतेमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरून याचा विरोध करत आहे.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलिसांवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे वाढते धाडस रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना द्या !
उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.
वेळागर येथे समुद्रात केल्या जाणार्या ‘पॅरासिलिंग’ या क्रीडा प्रकारामुळे मासेमारीकरता मासे उपलब्ध होत नाहीत.
सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ?