सातारा, २४ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पहावत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव असतांना दुसर्या यंत्रणेकडून अन्वेषण करा, असे म्हणायचे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवल्यासारखेच आहे. विरोधक सत्ताधार्यांवर टीका करतच असतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल भक्कमपणे चालू आहे. गृहमंत्रालयासमोर नेमकी परिस्थिती निर्माण होईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल. एखादा अधिकारी चुकला म्हणजे सर्व पोलीस खात्याला दोष देणे चुकीचे आहे. यापुढेही मुंबई पोलीस चांगली कामगिरी करत रहातील.’’