रेठरे बुद्रुक सोसायटीच्या खत विभागात २३ लाख रुपयांचा अपहार !

तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी नीतीवान समाज निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी धर्मशिक्षण द्यायला हवे !

प्रतीकात्मक छायाचित्र 

कराड, २४ मार्च (वार्ता.) – रेठरे बुद्रुक सोसायटीच्या खत विभागात २३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे पुनर्लेखा परीक्षणात आढळून आले आहे. याविषयी उपलेखा परीक्षक रोहित सूर्यवंशी यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून तत्कालीन खत विभागप्रमुख दिनकर बाळकृष्ण सोमदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (पहिले लेखा परीक्षण कुणी केले आणि त्यामध्ये हा भाग कसा लक्षात आला नाही, हे शोधून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)

रेठरे बुद्रुक येथील विकास सोसायटीच्या खत विभागाचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीतील लेखा परीक्षणाचे आदेश १० नोव्हेंबर २०१७ या दिवशी जिल्हा उपनिबंधक यांनी दिले होते. त्यानुसार लेखा उपनिरीक्षक यांनी हे काम पूर्ण केले. लेखा परीक्षणाअंती तत्कालीन खत विभागप्रमुख दिनकर सोमदे यांनी २३ लाख ५४ सहस्र ७६७ रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.