सांगली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ‘आय.एस्.ओ. ९००१’ प्रमाणपत्र प्राप्त !

आयुक्त नितीन कापडणीस (डावीकडे) यांना प्रमाणपत्र प्रदान करतांना पालकमंत्री जयंत पाटील (उजवीकडे)

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ‘आय.एस्.ओ. ९००१’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते २३ मार्च या दिवशी आयुक्त नितीन कापडणीस यांना प्रदान करण्यात आले. या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, ‘सिस्टीम मॅनेजर’ नकुल जकाते, तसेच अन्य उपस्थित होते.