सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठ

सोलापूर – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी दिली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले.

यानुसार आता विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने परीक्षा घेण्याची सिद्धता चालू केली आहे.