सचिन वाझे यांचे सहकारी अतिरिक्त पोलीस निरीक्षक रियाझ काझी माफीचे साक्षीदार !

स्फोटकेप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची न्यायालयात माहिती

रियाझ काझी व सचिन वाझे

मुंबई – प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात अतिरिक्त पोलीस निरीक्षक रियाझ काझी माफीचे साक्षीदार होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून २४ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात दिली. रियाझ काझी हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आहेत.