राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

चौधरी अजित सिंह

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र असलेले चौधरी अजित सिंह यांनी उत्तरप्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ७ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाचे दायित्वही सांभाळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.