रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची नाशिकच्या कारागृहात ठेवण्याची मागणी

पत्रकारिता करतांना ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ज्यांच्या विरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही आरोपी नगर आणि येरवडा कारागृहात आहेत. मलाही त्याच ठिकाणी ठेवले, तर माझ्या जिवाला धोका होऊ शकतो…..

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी २६ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना निवेदन देण्यात आले.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना वर्ष २०२० चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.

माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांची नवी मुंबई येथे ३९ वी पुण्यतिथी साजरी

माथाडी कामगार संघटनेचे (संस्थापक) स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी २३ मार्च या दिवशी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.

महावितरणने वीजदेयकाच्या संदर्भात ग्राहकांची पिळवणूक थांबवावी ! – वैद्य संजय गांधी

सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी प्रास्ताविकामध्ये महावितरणने सामान्य व्यापारी आणि सामान्य वीजग्राहक यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पिळवणूक थांबवावी. दळणवळण बंदीच्या काळात व्यापार मंदावला आणि परिणामी अर्थव्यवस्था कोलमडली.

तहसीलदाराने भ्रष्ट कमाई लपवण्यासाठी जाळल्या १५ ते २० लाखांच्या नोटा !

एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

चिनी सैनिक पँगाँगमधून हटले, तरी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील धोका टळलेला नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले.

मुसलमानांच्या विरोधानंतर ब्रिटनमधील शाळेत महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणारा शिक्षक निलंबित !

मुसलमान त्यांच्या धार्मिक भावनांविषयी सतर्क असतात आणि त्वरित त्याचा अवमान करणार्‍यांचा विरोध करतात, तर बहुतांश जन्महिंदु अशा घटनांविषयी निष्क्रीय असतात आणि त्यांच्यात धर्माभिमानही नसतो !

बावळाट येथे १० लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

पोलिसांनी ट्रक आणि चालक रवींद्र रामकिशन याला कह्यात घेतले.

सावंतवाडी येथे अज्ञाताकडून ४ चारचाकी गाड्यांची तोडफोड

एका अज्ञात दुचाकीस्वाराने गाड्यांची तोडफोड केल्याचे काही नागरिकांनी सांगितले.