सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई – प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडणे आणि मनसुख हिरण यांची हत्या या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ‘एन्आयए’ न्यायालयात याविषयी ७ मे या दिवशी सुनावणी झाली. या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे.