आमदार निधीतून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी व्यय करण्यास राज्यशासनाची मान्यता !

वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यशासनाने शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रुग्णालये यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आमदार निधीतून व्यय करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे.

याविषयी शासनाने अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आता आमदार निधीतून शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीसाठी, तसेच ऑक्सिजनच्या साठवणुकीसाठी टाक्या खरेदी करण्यासाठी आमदार निधीतून व्यय करता येणार आहे. आमदार निधीतून प्राणवायू सिलेंडर, व्हेन्टिलेटर, कोरोना प्रतिबंधक औषधे इत्यादी १० प्रकारच्या यंत्रसामुग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्याला राज्यशासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.