रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याची सूची केंद्र सरकारकडून जारी !

नवी देहली – कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने काही पदार्थांची सूची ‘माय गर्व्हमेंट इंडिया’ या खात्यावरून ट्वीट करून शेअर केली आहेत. तोंडाची चव जाणे आणि वास न येणे ही कोरोनाची लक्षणे मानली जातात. तोंडाची चवच गेल्याने कोरोना रुग्णांना जेवतांना अडचणी येतात. भूक लागत नसल्याने, अन्न गिळताना त्रास होत असल्याने रुग्ण फारसे काही खात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. अशा स्थितीत नरम पदार्थ ठराविक अंतरानं खाण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

कोरोना रुग्णाने हा आहार घ्यावा !

१. व्हिटामिन आणि मिनरल्स मिळवण्यासाठी फळे आणि भाज्या खाव्यात.

२. किमान ७० टक्के कोको असलेले डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खावे.

३. दिवसातून एकदा हळद घातलेले दूध प्यावे.

४. ठराविक अंतराने नरम पदार्थ खावेत. त्यात आमचूर घालावे.

५. नाचणी, ओट्स आणि राजगिरा यांचे पदार्थ खावेत.

६. प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया, सुकामेवा खावा.

७. अक्रोड, बदाम, ऑलिव्ह तेल आणि मोहरीचे तेल वापरावे.