यासाठी कोरोनाचे संकट यावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्व पक्षियांसाठी लाजिरवाणे होय !
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा हा महत्त्वाचा घटक झाला आहे; मात्र राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. अशा १६ सहस्र पदांची तातडीने भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ६ मे या दिवशी पत्रकारांना दिली. याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘भरती करावयाच्या पदांमध्ये ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १२ सहस्र कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे, तर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील प्रत्येकी २ सहस्र पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया चालू करण्यासाठी तातडीने आदेश काढण्यात येणार आहे.’’