बार मालकांसाठी पत्र पाठवणार्‍या शरद पवार यांनी शेतकर्‍यांसाठीही एखादे पत्र पाठवावे ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

डावीकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई – उपाहारगृह व्यावसायिक आणि बारचालक यांना कोरोनाची झळ बसली असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सवलती देण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवार यांना ‘याच कळकळीने आपण शेतकर्‍यांसाठीही एखादे पत्र पाठवाल’, अशी अपेक्षा आहे, असा टोला लगावला आहे.

पत्रात म्हटले आहे, ‘‘उपाहारगृह – परमिट बार मालक यांना अबकारी कराचा भरणा ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज देयकात सवलत मिळावी, तसेच मालमत्ता करात सूट मिळावी.