नागपूर येथे ३ लाख रुपयांची लाच घेणार्या दोघांना अटक !
८० लाख रुपयांचा कर माफ करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सूरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे त्यांची नावे असून ते येथील महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत