विमान प्रवाशाने ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्याने विमानाबाहेर काढले

विमानतळावर एक विमान उड्डाण करण्याच्या सिद्धतेत असतांना त्यात शिरणार्‍या ९ जणांच्या प्रवासी गटातील एकाने ‘अल्ला हु अकबर’ अशा घोषणा दिल्याने त्या सर्वांना विमानातून प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.

ब्लू व्हेल गेमची मुख्य सूत्रधार असणार्‍या रशियातील १७ वर्षीय मुलीला अटक

आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने गुन्हा स्वीकारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. न्यायालयाने तिला ३ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे अल्ला हु अकबर म्हणत आक्रमण करणारा आतंकवादी ठार

बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स येथे अल्ला हु अकबर अशी घोषणा देत एका सैनिकावर आक्रमण करणार्‍या सुराधारी जिहादी आतंकवाद्यास गोळी घालून ठार करण्यात आले.

जर कोणी अल्ला हु अकबर असे ओरडला, तर त्याला गोळ्या घालून ठार करा ! – इटलीच्या व्हेनिस शहराच्या महापौरांचा आदेश

जर कोणतीही व्यक्ती व्हेनिस शहरातील सेंट मार्क स्क्वायर येथे अल्ला हु अकबर असे ओरडत असेल, तर तिला गोळ्या घालून ठार करा, असा आदेश व्हेनिस शहराचे महापौर लुइगी ब्रोगान्रो यांनी दिला.

१७ वर्षांच्या विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याची चित्रफीत उघड झाल्याने रोमानियातील ऑर्थोडॉक्स चर्चच्या बिशपचे त्यागपत्र

ऑर्थोडॉक्स चर्चच्या कोरनेलियु बार्लाडीनू या बिशपने त्याची एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबरील शारीरिक संबंधाची चित्रफीत उघडकीस आल्याने बिशपपदाचे त्यागपत्र दिले आहे.

बार्सिलोना येथील आक्रमणातील इसिसचे ५ आतंकवादी ठार

येथील लास रॅमब्लासमध्ये १७ ऑगस्टच्या सायंकाळी  आतंकवादी आक्रमण झाले. सिटी सेंटरमध्ये एका पांढर्‍या व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले.

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून लेगिंग्जवर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून विडंबन

ऑस्ट्रेलियातील रेड बबल या आस्थापनाने त्याच्या लेगिंग्ज या उत्पादनावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून त्याचा अवमान केला आहे.

भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पंजमध्ये विषाणू असतात ! – जर्मनीतील संशोधकांचा दावा

स्वयंपाकघरात भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पंजमध्ये विषाणू असतात, असा दावा जर्मनीतील संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी १४ स्वयंपाकघरातील स्पंजमधून मिळालेल्या सूक्ष्मजीवांच्या डीएन्एची चाचणी केल्यानंतर त्यामध्ये मोराक्सेला ऑस्लोएन्सिससारखा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले.

जर्मनीमधील नाईट क्लबमध्ये इराकी नागरिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

जर्मनीच्या कान्सटान्स या शहरातील एका नाईट क्लबमध्ये ३४ वर्षांच्या इराकी नागरिकाने गोळीबार केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now