Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे हात जोडून नमस्कार करत केले अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत !

‘जी-७’ शिखर परिषद !

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हात जोडून नमस्कार करताना

रोम (इटली) – इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीत जी-७ शिखर परिषदेसाठी आलेल्या अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतीय संस्कृतीनुसार हात जोडून नमस्कार करत स्वागत केले. जॉर्जिया मेलोनी यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांचे स्वागत केले. या वेळी मेलोनी यांनी स्कोल्ज यांना हात जोडून नमस्कारही केला.

याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला असून भारतीय नागरिक मेलोनी यांचे कौतुक करत आहेत.