पंतप्रधान मोदी यांच्या इटली दौर्यापूर्वी घटना
रोम (इटली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जून या दिवशी ‘जी ७’ (अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, भारत आणि जपान) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणार आहेत. त्यापूर्वी इटलीमध्ये खलिस्तान समर्थकांनी मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. पुतळ्याच्या चौथर्यावर खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या संदर्भात लिखाणही केले. या घटनेवर भारताचे परराष्ट्र सचिव म्हणाले की, इटलीतील म. गांधी यांच्या पुतळ्याच्या करण्यात आलेल्या हानीचे सूत्र भारताने इटलीकडे उपस्थित केले असून पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त ‘जी ७’ शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो उपस्थित रहाणार आहेत.
संपादकीय भूमिकाभारताने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी इटलीवर दबाव आणणे आवश्यक आहे, अन्यथा ते आणखी गुन्हेगारी कृत्य करू धजावतील ! |