पाकिस्तानात मशिदीच्या मौलवीने युवकाचे केले लैंगिक शोषण !

वासनांध मौलवी ! मौलवीने रात्रभर युवकाला शिवीगाळ करून मारहाणही केल्याचे युवकाने पोलिसांना सांगितले. मौलवीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्यात आली आहे.

इम्रान खान यांची हत्या होईल किंवा आमची !

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका मुलाखतीत, ‘इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणाला अशा वळणावर नेऊन ठेवले आहे, जिथे एकतर त्यांची हत्या होईल किंवा आमची’, असे स्फोटक वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमध्ये श्री हनुमानाचा अवमान करणार्‍या मुसलमान पत्रकाराला अटक !

भारतात विविध माध्यमांतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात; मात्र बहुतांश वेळा संबंधितांवर कारवाई होत नाही. पाकमधील या कारवाईवरून भारताने बोध घ्यावा !

पाकमध्ये हिंदु दुकानदारांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित !

मागणीनुसार बिर्याणी बनवणार्‍या हिंदु दुकानदारांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित केल्याची घटना पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे घडली; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, ही घटना पाकच्या पंजाबमधील बहावलपूर येथील आहे.

पाकिस्तानात विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत ४ वृद्ध ठार

एका ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना रांगेत ठेवण्यासाठी लाठीमार केला. नागरिकांनी सरकारी वितरण केंद्रांवर गैरसोय असल्याचा, तसेच अल्प धान्य मिळत असल्याचा आरोप केला.

पाकिस्तानमध्ये सैन्य सत्ता हस्तगत करण्याची शक्यता !

पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्‍या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे. 

पाकव्याप्त काश्मीरमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब अपरिहार्य !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान शिक्षण विभागाने आदेश काढूद शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे.

आतंकवादी आक्रमणात पाकचा ब्रिगेडीअर ठार

तालिबानी आतंकवाद्यांनी घातपाताद्वारे या ब्रिगेडीअरची गाडी उडवून दिली. यात ७ सैनिक घायाळही झाले. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

काश्मिरी लोकांना भारतातच राहू द्या !  – पाकिस्तानी विशेषज्ञ सैयद शब्बर झैदी

पाकिस्तान आणि काश्मिरी लोकांना याखेरीज दुसरा पर्यायच नसल्याने ते आता असे बोलू लागले आहेत, हे लक्षात घ्या !

पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्याच्या विचारात !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टी’वर बंदी घालण्याचा विचार करत आहे.