काश्मिरी लोकांना भारतातच राहू द्या !  – पाकिस्तानी विशेषज्ञ सैयद शब्बर झैदी

उजवीकडे सैयद शब्बर झैदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर काश्मिरी लोकांनी भारतात रहाण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्यांना तेथेच राहू द्या, असे ट्वीट पाकिस्तानी विशेषज्ञ सैयद शब्बर झैदी यांनी केले आहे. झैदी यांनी अनेक ट्वीट केले आहेत. त्यात त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. ते म्हणाले की,

१. संयुक्त अरब अमिरातने काश्मीरमध्ये गुंतवणूक केली आहे. ही दुःखद आणि वर्ष १९४७ नंतरची महत्त्वपूर्ण घटना आहे. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरच्या बाहेरील लोकांना तेथे भूमी खरेदी करण्याची अनुमती मिळाली आहे. आपण (पाकिस्तान)  कुठे आहोत ?

२. या गोष्टींद्वारे काश्मीरची समस्या सुटत आहे. भारत आणि जग काश्मीरमध्ये गुंतवणूक करील आणि काश्मीरला आशियातील स्वित्झर्लंड बनवतील.

३. आता काश्मीरच्या लोकांना निर्णय घ्यायचा आहे. जर आर्थिक विकास त्यांच्यासाठी अनुकूल असेल, तर ते भारतासमवेत असतील.

४. भारताने वर्ष २००२ ते २०२३ या कालावधीत पाकिस्तानला सर्वच आर्थिक स्तरांवर मागे टाकले आहे. पाकिस्तान देशातील साधनांचा वापर जनतेच्या कल्याणाऐवजी शेजारी देशामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी करत राहिला. अनेक दशकांची राजकीय अस्थिरता आणि चुकीचे आर्थिक व्यवस्थापन, यांमुळे पाकमध्ये संकट निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान आणि काश्मिरी लोकांना याखेरीज दुसरा पर्यायच नसल्याने ते आता असे बोलू लागले आहेत, हे लक्षात घ्या !