इम्रान खान बाहेर पडताच प्रवेशद्वार तोडून त्यांच्या घरात घुसले पोलीस !

इस्लामाबाद न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी इम्रान खान मार्गस्थ !
पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या झटापट

आम्ही कधीही पाकसमवेतचे व्यापारी संबंध तोडले नाहीत ! – भारत

भारताचे पाकमधील उप उच्चायुक्त सुरेश कुमार पुढे म्हणाले, ‘‘भारताला कायमच पाकसमवेत चांगले संबंध हवे आहेत; कारण आम्ही आमचा भूगोल पालटू शकत नाही. पाकसमवेतचे व्यापारी संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.

रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० सहस्र टन गहू सरकारी अधिकार्‍यांनी हडपला !

यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतांना अणू कार्यक्रमाविषयी तोडजोड करणार नाही ! – पाकिस्तान

पाकिस्तानी जनतेकडे एक वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे; मात्र तेथील राज्यकर्त्यांना अणूबाँब हवा आहे. जनताही याचा विरोध करत नाही. यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात येते.

वर्तमानपत्रे आणि नियतकालिक यांतून कुराणचा अवमान केल्यास जन्मठेपेची शिक्षा !

पाकिस्तान सरकारचा आदेश !
पाकिस्तानमध्ये धर्माविषयी कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यानेच सरकार अशा प्रकारचा आदेश देऊ शकते ! भारतातही असे करणे आवश्यक आहे !

पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ !

पाकिस्तानमध्ये वर्ष २०२२ मध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा घटनांत एकूण ६४३ लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या २९२ होती.

माझ्‍याकडे भारताचे आधार कार्ड आहे !

भारतातील बांगलादेशी आणि पाकिस्‍तानी घुसखोरांकडे आधार कार्ड सापडल्‍याच्‍या सहस्रो घटना समोर आलेल्‍या असल्‍याने जर शोएब अख्‍तर असा दावा करत असेल, तर त्‍यात आश्‍चर्य वाटू नये ! भारतातील प्रशासकीय व्‍यवस्‍थेमध्‍ये भ्रष्‍टाचार इतका मुरला आहे की, भ्रष्‍टाचारी भारताला विकूनही खातील, असेच लोकांना वाटते !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अद्यापही अटक नाही !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न गेल्या २४ घंट्यांपासून पाकिस्तानचे पोलीस करत आहेत. पोलीस लाहोर येथील जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोचलेले आहेत; मात्र त्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या हिंसारचारामुळे पोलीस इम्रान यांना अटक करू शकलेली नाहीत.

हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कराचीमध्ये ३० मार्चला विधानभवनावर मोर्चा

अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्‍या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता ! – पाकचे माजी अर्थमंत्री

ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्‍वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.