पाकिस्तानात मशिदीच्या मौलवीने युवकाचे केले लैंगिक शोषण !

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

मशिदीच्या महंमद रियाझ मौलवीने एका युवकाचे केले लैंगिक शोषण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या गुजरात जिल्ह्यातील एका मशिदीच्या महंमद रियाझ नावाच्या मौलवीने एका युवकाचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. मौलवीने पीडित युवकाला रमझानचे निमित्त करून मशिदीत बोलावले. रात्री त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केले. घटना ९ मार्च या दिवशीची असून पोलिसांनी मौलवीला नुकतीच अटक केली.मशिदीच्या महंमद रियाझ मौलवीने एका युवकाचे केले लैंगिक शोषण

मौलवीने रात्रभर युवकाला शिवीगाळ करून मारहाणही केल्याचे युवकाने पोलिसांना सांगितले. मौलवीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला २८ मार्च या दिवशी अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

वासनांध मौलवी !