आतंकवादी आक्रमणात पाकचा ब्रिगेडीअर ठार

ब्रिगेडीअर मुस्तफा कमाल बरकी (चौकटीत)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या वजिरिस्तानच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या आतंकवादी आक्रमणात पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा ब्रिगेडीअर मुस्तफा कमाल बरकी हा ठार झाल्याचे वृत्त आहे.

तालिबानी आतंकवाद्यांनी घातपाताद्वारे या ब्रिगेडीअरची गाडी उडवून दिली. यात ७ सैनिक घायाळही झाले. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.