पाकिस्तानात विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत ४ वृद्ध ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान)- दिवाळखोरीकडे वाटचाल करणार्‍या पाकिस्तानमध्ये अन्नटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारकडून विनामूल्य धान्य देण्यात येत आहे; मात्र हे धान्य घेतांना लोकांची झुंबड उडत आहे. असेच विनामूल्य धान्य घेतांना पंजाबमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ वृद्ध नागरिक ठार झाले, तसेच अनेक जण बेशुद्धही पडले.

एका ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना रांगेत ठेवण्यासाठी लाठीमार केला. नागरिकांनी सरकारी वितरण केंद्रांवर गैरसोय असल्याचा, तसेच अल्प धान्य मिळत असल्याचा आरोप केला.