इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सैन्याने वरिष्ठ सैन्याधिकार्यांची परिषद आयोजित केली आहे. यात देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि अस्थिर राजकीय संकट यांवर चर्चा होणार आहे. काही राजकीय तज्ञांच्या मते पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्यातील दरी वाढत आहे. त्यांच्यातील वाढता वाद लक्षात घेता सैन्य पाकिस्तानात चौथ्यांदा सत्ता हस्तगत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सौजन्य: News Nation
आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून पाकिस्तानला आर्थिक साहाय्य मिळवायचे असल्यास त्याने काही अटी घातल्या आहेत. त्यात सैन्यावर होणार्या खर्चात कपात करण्याची अट ठेवण्यात आली आहे. यानुसार पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे.