(म्हणे) ‘पाकिस्तानी सैन्याचा लोकशाहीवर विश्‍वास !’ – पाक सैन्य

पाकिस्तानी सैन्याचा विनोद ! पाकिस्तानमध्ये लोकशाहीपेक्षा सैन्याशाहीच सर्वाधिक काळ राहिलेली आहे. त्यामुळे आताही तीच स्थिती निर्माण होणार, यात पाकिस्तान्यांनाही शंका राहिलेली नाही !

इम्रान खान यांना सर्व प्रकरणांत जामीन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटींसह २ आठवड्यांसाठी जामीन संमत केला. त्यांच्यावर अल् कादीर ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता.

पाकिस्तानी सैन्याने विष पाजून महंमद अली जिना यांना मारले ! – अल्ताफ हुसेन, एम्.क्यू.एम्. पक्ष

पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले.

पाकिस्तान सरकार देशात आणीबाणी लागू करण्याच्या विचारात !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार झाला. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये मुलीच्या विनयभंगाला विरोध करणार्‍या हिंदु पित्याचा जिहाद्यांनी केला शिरच्छेद !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका हिंदु पित्याने त्यांच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या जिहाद्यांना विरोध केला. या रागातून जिहाद्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. अलमाख भील असे मृत हिंदु व्यक्तीचे नाव आहे.

इम्रान खान यांची अटक अवैध असल्याने त्यांची सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालय

३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती.

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता ! – इम्रान खान यांचा आरोप

मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. इम्रान खान २ प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात आले असतांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

पाक १९९ भारतीय मासेमारांची सुटका करण्याच्या सिद्धतेत !

सद्भावनेच्या दृष्टीकोनातून पाक सरकार १९९ भारतीय मसेमारांची १२ मे या दिवशी सुटका करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त आहे. सध्या हे सर्व आरोपी कराची येथील कारागृहात आहेत.