पाकमधून सौदी अरेबियामध्ये भीक मागण्यासाठी जाणार्‍या १६ पाकिस्तान्यांना विमानातूनच उतरवले !

मुलतान (पाकिस्तान) – जगामध्ये भीक मागतांना पकडण्यात येणार्‍यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९० टक्के लोक पाकिस्तानी असतात, असे स्वतः पाकिस्तान सरकारच्या एका समितीकडूनच सांगण्यात आल्याच्या दोनच दिवसांनंतर पाकच्या मुलतान येऊन सौदी अरेबिया येथे जाणार्‍या १६ पाकिस्तानी भिकार्‍यांना विमानातून खाली उतरवण्यात आले.  यात ११ महिला, ४ पुरुष आणि १ मुलगा यांचा समावेश आहे. हे सर्व जण हज यात्रेच्या नावाखाली सौदी अरेबियामध्ये जात होते. त्यांना अधिक चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.

विमानतळावरील अधिकार्‍यांनी या सर्वांची चौकशी केली असता त्यांनी मान्य केले की, ते भीक मागण्यासाठी सौदी अरेबियामध्ये जात होते. तसेच त्यांनी हेही मान्य केले की, ते भीक मागून जी काही रक्कम कमावणार होते, त्यातील अर्धी रक्कम त्यांना तेथे पाठवण्यासाठी व्यवस्था करणार्‍या हस्तकांना द्यावी लागणार होती.

संपादकीय भूमिका 

  • यथा राजा तथा प्रजा ! आता अन्य देशांकडे भीक मागण्यासाठी जाणार्‍या पाकच्या राज्यकर्त्यांनाही अशा प्रकारे विमानातून उतरवण्याचे धाडस दाखवण्यात येईल का ?
  • पाकची ही स्थिती पहाता भारतातील पाकप्रेमींना भारताचे महत्त्व लक्षात येईल, याची अपेक्षा करता येत नाही; कारण ‘भारताला इस्लाममय करणे’, हाच त्यांचा एकमात्र उद्देश आहे, हे लक्षात घ्या !