पाकिस्तानच्या आरोग्य मंत्र्याचा आरोप !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आली आहेत, असा आरोप पाकचे आरोग्य मंत्री नदीम जान यांनी केला. जान यांची हा आरोप पाकमध्ये पोलिओची ३ नवीन प्रकरणे समोर आल्यावर आली. पाकच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या पोलिओ प्रयोगशाळेच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान आणि पेशावर येथून एकत्र करण्यात आलेल्या ‘सीवेज’च्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात आल्यावर त्यात पोलिओचा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले.
सौजन्य डॉनन्यूज इंग्लिश
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हेच २ देश आहेत, जेथे पोलिओ विषाणूचा संसर्ग स्थानिक बनला आहे. वर्ष २०२१ मध्ये ‘जंगली पोलियो विषाणू’चे संक्रमण खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या दक्षिणेतील ७ जिल्ह्यांपर्यंतच सीमित असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती. पाकिस्तान सरकार देशभरात जवळपास ४.४ कोटी मुलांचे पोलिओ लसीकरण करणार असून त्यासाठी ५ दिवसांचे लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाअसे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार ! |