देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

कीर्तनातून भारतीय संस्कृतीचे जतन होते !  सुभाष शिरोडकर

याप्रसंगी सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘कीर्तनामुळे संस्कार मिळतात. भगवद्गीता, स्तोत्रे मुखात येतात. यामुळे समाजात एकता निर्माण होते; म्हणून आज तरुण मुलामुलींनी कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यावे. ही काळाची आवश्यकता आहे.’’

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधाने बळजोरीने टिपू सुलतानची प्रतिमा लावली !

उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांकडून तळोजा (जिल्हा रायगड) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नाशिक येथील सैनिक नितीन भालेराव हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात येथील  सी.आर्.पी.एफ्.चे जवान नितीन भालेराव हुतात्मा झाले आहेत. रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले.

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यावर संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी घोषणा देणारे ३ तरुण पोलिसांच्या कह्यात

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून संत श्री आसारामजी बापू यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या.

श्री जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने लाखाहून अधिक भाविक

कार्तिक पौर्णिमेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथून लाखाहून अधिक भाविक आले होते. यामुळे डोंगरावर यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. ‘चांगभल’च्या घोषणेने डोंगर दणाणून गेला.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक !

गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे.

लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?

गुरु आणि शनि ग्रहांच्या युतीमुळे राजकीय पक्ष अन् संघटना यांमध्ये फूट पडण्याची शक्यता

भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारखे विषय पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. यामुळे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटू शकते.