शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?
एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?
पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदू वाझेकर यांच्याकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी परमानंद हंसराज ठक्कर या छोट्या राजनच्या हस्तकाला पुण्याच्या कोंढव्यातून अटक केली आहे.
भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यम, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.
हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली.
हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्तीजवळ घडली; मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही.
पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला.
प्रशासकीय मान्यता मिळालेला कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.