रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांची मागणी

अकोला – पुणे येथे ३० जानेवारी या दिवशी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली. येथील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ३ फेब्रुवारी या दिवशी हे निवेदन देण्यात आले आहे. या वेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, शरजील याने भाषणात हिंदु समाजाविषयी अपशब्द काढून हिंदु समाजाचा अवमान केला होता. हे कृत्य हिंदुस्थानमध्ये राहून हिंदूंविरुद्ध करण्यात आलेले षड्यंत्र आहे. शरजील याच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
भारतात राहून हिंदूंविषयी अपशब्द बोलणे अयोग्य ! – आमदार गोवर्धन शर्मा
भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, ‘‘भारतात राहून हिंदु धर्माविषयी अपशब्द बोलणे, हे अयोग्य आहे. शरजील याच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. हेच वाक्य जर पाकिस्तानमध्ये मुसलमानांविषयी म्हटले गेले असते, तर त्याचे परिणाम काय झाले असते, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे हिंदूंचा अंत पाहू नये. शरजील याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी.’’
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !