सीना नदीपात्रातून वाळूउपसा करणारे २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त

सीना नदीपात्रात अनधिकृतपणे राजरोसपणे वाळूउपसा चालू आहे. बीड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आष्टी तालुक्यात येऊन टाकळसिंग जवळच्या सीना नदीपात्रात धाड टाकून २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येतील ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !

जिल्ह्यात आज शिवसेना आणि भाजप यांची आंदोलने

जिल्ह्यात ५ फेब्रुवारीला शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात, तर भाजप वीजदरवाढ आणि वीजदेयके थकित असलेल्या ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.

राज्यातील ३ प्रकल्पांमुळे वन्यजीव नष्ट होणार असल्याने हस्तक्षेप करावा ! – आमदार विजय सरदेसाई यांची ‘युनेस्को’कडे मागणी

मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे.

सातारा येथे पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून युवकाचे आंदोलन

शेतातील पिकाची चोरी होत असल्याविषयी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने भुरकवडी (जिल्हा सातारा) येथील युवकाने पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून आंदोलन केले.

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. गोवा राज्य गेली अनेक मास हे भोगत आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

पुणे येथे पोलिसांकडूनच पोलिसी गणवेश घालण्याच्या नियमांचे पालन नाही

नागरिकांना शिस्तीचे धडे देणारे पोलीसच शिस्त पाळत नसतील, तर अशा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कसा रहाणार ?

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यापासून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले.