सातारा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रशासकीय मान्यता मिळालेला अनुमाने ३ सहस्र कोटी रुपयांचा कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सातारा जिल्ह्यातील रेल्वेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्याविषयी ३ फेब्रुवारी या दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची देहली येथे भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. पर्यटनदृष्ट्या सातारा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करण्यात यावे.
२. महागाव येथे सातारा रेल्वे स्थानकाची ५० एकर भूमी मोकळी आहे. त्या जागेत रेल्वेने स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करावा. म्हणजे तेथे निर्माण झालेली वीज रेल्वेला स्वतःच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल.