कोलकात्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

ममता बॅनर्जी या उत्तर कोरियातील हुकुमशहासारख्या वागत आहेत ! – भाजप

बंगालमध्ये भाजपच्या मोर्च्यावर देशी बाँबने आक्रमण : स्फोटात २ कार्यकर्ते घायाळ

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल ‘बाँब बनवण्याचा कारखाना’ बनला आहे. तेथील कायदा आणि सुव्यस्थेचे तीन तेरा वाजल्याने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य !

कोलकात्यातून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

बंगालमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या दोघा सैनिकांना अटक

सीमा सुरक्षा दलाच्या ६८ व्या बटालियनच्या या दोघा सैनिकांनी २५ ऑगस्टच्या रात्री बगदा सीमेवरील जितपूर बीओपीजवळील एका शेतात नेऊन एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

बंगालमधून अल्-कायद्याच्या दोघा संशयित आतंकवाद्यांना अटक

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील खारीबाडी भागातून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला पशू तस्करीच्या प्रकरणी अटक

पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकाने सहकार्‍यांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ

‘हा गोळीबार का करण्यात आला ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हुगळी (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या मोर्च्यावर आक्रमण

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

४ घुसखोर रोहिंग्या मुसलमान महिलांना त्यांच्या देशात पाठवण्यावर कोलकाता उच्च न्यायालयाची स्थगिती

वर्ष २०१६ मध्ये या महिलांना त्यांच्या १३ मुलांसह भारतात घुसखोरी केल्यामुळे पकडण्यात आले होते.

कूचबिहार (बंगाल) येथे ‘पिकअप’ वाहनामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने १० भाविकांचा मृत्यू

वाहनामध्ये विद्युत यंत्रणा करतांना आवश्यक ती काळजी न घेणार्‍या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये ?