बंगालमध्ये मंदिराबाहेर गळफास लावलेला साधूचा सापडला मृतदेह !

भाजपकडून पोलीस महासंचालकांना योग्य अन्वेषण करण्याची मागणी

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षेनेते आणि भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी छायाचित्रेही पोस्ट केले आहे.

सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले की, अघोरी पंथ साधूच्या अनैसर्गिक मृत्यूच्या वेदनादायक बातमीने व्यथित झालेल्या जगभरातील अनेक हिंदु साधू आणि आध्यात्मिक गुरु यांचे शेकडो दूरभाष मला येत आहेत. मी राज्याचे पोलीस महासंचालक एच्.के. द्विवेदी यांना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाचे योग्य अन्वेण करावे. तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाचे चित्रीकरण करण्यात यावे. हा गुन्हा असेल, तर गुन्हेगारांना लवकर पकडले पाहिजे.