बंगालमध्ये संतप्त जमावाने जाळले पोलीस ठाणे !

अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांधाने बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण

संतप्त जमावाने जाळले पोलीस ठाणे

दिनाजपूर (बंगाल) – येथे २१ एप्रिल या दिवशी एका अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध मुसलमानाने केलेला बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. या मुलीच्या शवविच्छेदनात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगण्यात आल्याने आदिवासी आणि राजबंशी समाजातील लोक येथील कालियागंज पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत होती. त्यांचा उद्रेक होऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करत पोलिसांना मारहाण केली आणि पोलीस ठाणे जाळले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या वेळी पोलिसांनी लोकांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पोलिसांनी मुलीच्या हत्येच्या प्रकरणी जावेद नावाच्या तरुणाला अटक केली होती. मुलीचा मृतदेह पोलीस फरफटत नेत आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून यापूर्वी प्रसारित झाल्यामुळे ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

कायदा हातात घेणे कधीही चुकीचे; मात्र हे पूर्ण प्रकरण पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. ‘त्याचाच परिपाक पोलीस ठाणे जाळण्यात झाला असावा’, असे म्हटल्यास चूक ते काय ? पोलीस यातून काही बोध घेतील तो सुदिन !