ईदनिमित्त मुसलमानांना भेटण्यासाठी आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विधान !
कोलकाता (बंगाल) – आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. (दंगलखोरांना पाठीशी घालून शांतता राखता येत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे विधान म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे ! – संपादक) ज्यांना देश तोडायचा आहे, त्यांना मी ईदच्या निमित्ताने सांगू इच्छिते की, मी जीव द्यायला सिद्ध आहे; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २२ एप्रिल या दिवशी येथे रमझान ईदनिमित्त मुसलमानांना भेटण्यासाठी आल्या असतांना केले.
‘Won’t allow India to be divided’: Mamata Banerjee’s message on Eid | Indiablooms – First Portal on Digital News Management https://t.co/tRZWC2TAMX #Eid, #MamataBanerjee, #India, #WestBengal
— India Blooms (@indiablooms) April 22, 2023
संपादकीय भूमिकाममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी ! |