हिंसाचारांची चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण

कोलकाता (बंगाल) – यावर्षी रामनवमीनिमित्त बंगालमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर काही ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणांच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व हिंसाचारांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) करण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचारांत बाँबस्फोटही करण्यात आल्याने यांची चौकशी एन्.आय.ए.कडून करण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने या हिंसाचारांच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि सीसीटीव्ही चित्रण पुढील २ आठवड्यांमध्ये एन्.आय.ए.ला सोपवण्याचाही आदेश बंगाल पोलिसांना दिला आहे.

संपादकीय भूमिका

कोलकाता उच्च न्यायालयाचा अभिनंदनीय निर्णय ! आता एन्.आय.ए.ने या हिंसाचारांच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने धर्मांध मुसलमानांना कशा प्रकारे पाठीशी घातले, हे पुराव्यासहित जनतेसमोर आणावे, अशीच हिंदूंची अपेक्षा !