बंगालमध्ये ३४ सहस्र किलो स्फोटकांचा साठा जप्त !

  • फटाक्यांवर घातली बंदी !

  • १०० जणांना अटक

कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी राज्यात विविध ठिकाणी धाडी घालून ३४ सहस्र किलो स्फोटकांचा साठा आणि अवैध फटाके जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण १३२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी या धाडीनंतर फटाक्यांवरही बंदी घातली आहे. पोलिसांनी घातलेल्या धाडींच्या ठिकाणी अवैधरित्या फटाके बनवले जात होते. त्यासाठी स्फोटके वापरण्यात येत होती. गेल्या ८ दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या बनवण्यात येणार्‍या फटाक्यांच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका

  • अवैध फटाक्यांच्या निर्मितीमुळे झालेल्या स्फोटात १७ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई करणारे बंगाल सरकारचे पोलीस !
  • अवैधरित्या फटाके बनवले जात आहेत, हे पोलिसांना आधी ठाऊक नव्हते, असे कुणी म्हणू शकेल का ? भ्रष्टाचारामुळे याकडे पोलीस दुर्लक्ष करत होते, हे यातून स्पष्ट दिसत आहे. संबंधित भ्रष्ट पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे !