इरशाळवाडीतील बाधितांना सिडकोच्‍या माध्‍यमातून कायमस्‍वरूपी घरे देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

इरशाळवाडीमधील बाधित कुटुंबियांची तात्‍पुरती कंटेनरमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या सर्व कुटुंबांची कायमस्‍वरूपी निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे.

पुणे येथील ‘रुबी हॉल’ मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली !

रुबी हॉल रुग्‍णालयातील मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी राज्‍य सरकारने ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली आहे. या समितीच्‍या अध्‍यक्षपदी उच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्‍यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांच्‍या आश्रमात ‘ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ’ पार पडला !

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी आश्रमात ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सातारा येथील वेदशास्‍त्रसंपन्‍न श्री. गोविंदशास्‍त्री जोशी यांच्‍या अधिपत्‍याखाली हा सोहळा पार पडला. 

पाकच्‍या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असणारे ३ जण अटकेत !

आतंकवाद रोखण्‍यासाठी सरकारने आतंकवाद्यांना जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्‍यक आहे !

इरशाळवाडीसारख्‍या घटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत ! – डॉ. माधव गाडगीळ

डॉ. गाडगीळ यांच्‍यासारख्‍या तज्ञांच्‍या अहवालांचा अभ्‍यास करून त्‍यानुसार शासनाने कृती करावी, ही अपेक्षा !

बोगस मद्य रोखण्यासाठी राज्यातील मद्याचे ‘लेबलीकरण’ होणार ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क विभाग

महाराष्ट्रात डुप्लिकेट मद्य सिद्ध होत आहे. यामुळे महाराष्ट्रात मद्याचा महसूल बुडतो. उत्तर प्रदेश, देहली, पंजाब येथील राज्यांत मद्यापासून मिळणारा महसुलाचा अभ्यास आम्ही केला आहे. याविषयीचा अहवाल आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार आहोत.

मराठावाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात ! – एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस  

मराठवाड्यात १०० दिवसांत १७०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या !

विधानसभेत तंबाखूजन्य पदार्थ बंदीची चर्चा; मात्र प्रवेशद्वारावर सापडल्या गुटख्याच्या पुड्या !

तंबाखूजन्य पदार्थावरील बंदीचा कायदा होतो, त्या ठिकाणीच तंबाखूजन्य पदार्थ सापडणे, याकडे सरकारने लक्ष द्यावे !

‘ईडी’ने साई रिसॉर्टला ठोकले टाळे !

ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टला १९ जुलै या दिवशी टाळे ठोकले. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टच्या बांधकामात ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

चिपळूण आणि खेड येथील पूर ओसरला

चिपळूण आणि खेड येथील पावसाचा जोर न्यून होताच येथील पूर ओसरल्यामुले विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्ववत् होत आहे. कुंभार्ली आणि आता परशुराम घाटातून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.