राज्‍यातील माध्‍यान्‍ह भोजन योजनेच्‍या घोटाळ्‍यांच्‍या आरोपांचे कामगार आयुक्‍तांकडून अन्‍वेषण होणार ! – डॉ. सुरेश खाडे, कामगारमंत्री

जिल्‍हा स्‍तरावर कामगारांना जी घरे दिली जातात किंवा इतर योजनेच्‍या अंतर्गत सोयी पुरवल्‍या जातात, त्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांची समिती नेमली जाईल आणि त्‍याची कार्यवाही व्‍यवस्‍थित होत आहे का ? याकडे ही समिती लक्ष ठेवणार आहे.

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडप करणारा वक्‍फ कायदा रहित करा ! 

वक्‍फ कायद्याद्वारे वक्‍फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्‍हे, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्‍याचा अधिकार आहे, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्‍य समाजातील विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासाठी कोल्‍हापूर येथे स्‍थापन केलेल्‍या ‘द मोहामेडन एज्‍युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्‍याची प्रक्रिया वक्‍फ बोर्डाने चालू केली आहे.

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास कोणतीही बंदी नाही; मात्र प्रदूषण टाळण्‍यासाठी कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवणार !

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास शासनाने कोणतीही बंदी केलेली नाही; मात्र या मूर्तींमुळे कोणत्‍याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये; म्‍हणून कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवण्‍यात येईल. राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना तशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड !

ज्‍येष्‍ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्‍मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत.

पुण्‍यात ५ सहस्र बांगलादेशी नागरिकांचे वास्‍तव्‍य; केवळ ५ जणच मायदेशी परतले !

एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्‍या पोलिसांना आजन्‍म कारागृहात टाका !

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी एक दरड कोसळली !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्‍याजवळ २४ जुलैला सकाळी ६ वाजता आणखी एक दरड कोसळली होती. ही दरड लहान होती. प्रशासनाकडून तातडीने मार्गावरील ही दरड हटवण्‍यात आली.

मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम दिली जाणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंपदा विभागाची कामे करतांना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी, या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात पालट करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल.

राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर !

२४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्‍याने पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने त्‍यातून कधीही विसर्ग चालू होण्‍याची शक्‍यता असल्‍याने पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर आहे.