दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे शेकोटीत भावडांचा होरपळून मृत्यू; गडचिरोली येथे वाघिणीला पकडले…

गडचिरोली येथील दक्षिण भागातील २ महिलांचा बळी घेणार्‍या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले आहे.

महाराष्ट्रातही २२ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी !

अयोध्येत होणार्‍या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी गेली ३१ वर्षे अनवाणी रहाणारे शिये (जिल्हा कोल्हापूर) येथील निवास पाटील !

श्री. निवास पाटील म्हणाले, ‘‘६ डिसेंबर १९९२ या दिवशी झालेल्या कारसेवेत माझ्यासह १५ शिये ग्रामस्थांचा सहभाग होता.

 Narendra Modi Permanent Houses:देशातील ४ कोटी लोकांना आम्ही पक्की घरे देऊ शकलो ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज १ लाखांपेक्षा अधिक परिवाराचा गृहप्रवेश होईल’, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.

Harikumar Navy Unit  Konkan:कोकण किनारपट्टीच्या भागात लवकरच नौदलाचे ‘युनिट’ स्थापन होणार ! – हरिकुमार, नौदलप्रमुख

चाचेगिरीची आक्रमणे सोमालियाच्या किनार्‍यापासून अनुमाने २ सहस्र कि.मी.वर झाली आहेत. या वर्षाच्या आरंभीला अचानक जहाजांवर आक्रमणे वाढल्याचे पहायला मिळाले.

Pujyapad Santshree Asaramji Bapu Bail:पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन किंवा पॅरोल, तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करावेत !

सनातन धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या संतांच्या बाजूने बोलण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही का ? बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्कांचे हनन होत आहे.

महाराष्ट्रात एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारलेले नाही !

महाराष्ट्रात महिलांशी संबंधित अत्याचारांचे प्रमाण वाढते असल्याने अशी  पोलीस ठाणी उभारणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नवे चित्रपट धोरण लवकरच लागू करणार ! – अविनाश ढाकणे, व्यवस्थापकीय संचालक, ‘फिल्म सिटी’

देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात; मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे. असे महोत्सव तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार चांगल्या पद्धतीचे चित्रपट धोरण बनवत असून त्याद्वारे चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यास साहाय्य होईल.

ठाणे येथील इंग्रजी शाळेचे शुल्क न भरल्याने परीक्षा चालू असतांना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले !

पालकांनी आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी झाली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकार्‍यांना रोखले.

बदलापूर येथील रसायनाच्या आस्थापनात भीषण स्फोट !

हे स्फोट इतके भयंकर होते की, ५ किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.