प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या येथील समाधी मंदिरात २८ ऑक्टोबर यादिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला……

आंबोली-आजरा सीमेवर हत्तीच्या आक्रमणात वन कर्मचार्‍याचा मृत्यू 

आंबोली (सिंधुदुर्ग) आणि आजरा (कोल्हापूर) या गावांच्या सीमेवर घाटकरवाडी येथे हत्तीने केलेल्या आक्रमणात कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी प्रकाश पाटील (वय ५४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

पेठ शिवापूर (सातारा जिल्हा) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाने पाडावा !

सकल हिंदु समाजाची मागणी  

पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा येथे भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त : महानगरपालिकेचे दुर्लक्ष !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सर्वत्रच्या भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू !

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.

अंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली !

२९ ऑक्टोबरपासून गावागावात ‘आमरण उपोषण चालू करा’, असे आवाहन मराठा समाजाला करून ‘कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणीही त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मिरज येथे मंत्री सुरेश खाडे यांच्या वाहनांचा ताफा अडवला !

शासनाकडून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी घोषित केले. येथून पुढे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात येणार आहे, असे ‘मराठा क्रांती मोर्चा’चे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी !

एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्‍याने सांगितले आहे.

जीवनातील शाश्वत आनंदासाठी नर्मदा परिक्रमा ! – मिलिंद चवंडके

नर्मदेची पायी परिक्रमा हे सर्वांग सुंदर धार्मिक व्रत-तपश्चर्या आहे. आपली पूर्वपुण्याई असेल, तरच नर्मदामैय्या परिक्रमा करू देते. परिक्रमा श्रद्धेने केल्यास जीवनातील शाश्वत आनंदाची प्राप्ती होते.

कार्ला येथील श्री एकवीरादेवी मंदिर परिसराचा विकास लवकरच होईल ! – डॉ. नीलम गोर्‍हे

श्री एकवीरादेवी मंदिराच्या पायर्‍यांची दुरुस्ती, ‘रोप वे’, भक्त निवास यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) दायित्व सोपवले आहे.