नागपूर येथे शेकोटीत भावडांचा होरपळून मृत्यू
नागपूर – आई-वडील घरात नसतांना ३ मुलांनी शेकोटी पेटवल्यानंतर घराला आग लागली. ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला. या आगीत ७ आणि ३ वर्षीय भावडांचा मृत्यू झाला. एक १० वर्षीय मुलगी घरातून बाहेर आल्याने वाचली.
गडचिरोली येथे वाघिणीला पकडले
गडचिरोली – येथील दक्षिण भागातील २ महिलांचा बळी घेणार्या वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले आहे.
महाराष्ट्रात गारठा वाढला !
नागपूर – उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम होऊन राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. ‘पुढील २ दिवस ही थंडी कायम राहील’, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळा होणार अद्ययावत् !
मुंबई – रासायनिक आणि अणुजीवीयदृष्ट्या पाणी आणि अन्नपदार्थ नमुन्यांच्या पडताळणीसाठी राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३५ पैकी २२ प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा अद्ययावत् करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे !