सनातन संस्थेचे मुंबई आणि पालघर जिल्ह्यासह देशभर ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपासून चालू झाले आहे. मंदिरे, कार्यालये, रहिवासी संकुलामध्ये हे अभियान होत असून भाविकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जालना येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनकर्ते मनोज जरांगे रवाना !

मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ !

इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे व्यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

गुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध ! अशांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

मांस-मद्य विक्रेत्यांना २२ जानेवारीला दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना !

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी या गावाने अभिनंदनास्पद जाहीर सूचना प्रदर्शित केली आहे.

२२ जानेवारीला मांस आणि मद्य विक्रीला निपाणीमध्ये बंदी करा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

निपाणी भागातील सर्व प्रकारची मटण, चिकन, मासे, तसेच देशी अन विदेशी मद्य (दारू) यांची विक्री एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना कर्नाटकच्या वतीने उपतहसीलदार मृत्युंजय डगी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.

२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे २२ जानेवारीला मांसविक्री आणि मद्यबंदीचे आदेश !

या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे येथे ‘आभासी मराठी साहित्य संमेलना’चे २० आणि २१ जानेवारीला आयोजन !

साहित्य अकादमी पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध कांदबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली येथे २० आणि २१ जानेवारी या दिवशी ‘आभासी मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्या येथील कार्यक्रमानिमित्त श्रीक्षेत्र चाफळ येथे भव्य सोहळ्याचे आयोजन !

२ जानेवारी या दिवशी पहाटे ४.४५ वाजता प्रभु श्रीरामाची काकड आरती होईल. नंतर सकाळी ८ वाजता भजन होईल. सकाळी १० वाजता रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि मनोबोध यांचे पठण होईल.