१ ठार, तर ४ जण घायाळ
ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – बदलापूर येथील खरवई या भागात असलेल्या व्ही.के. या रसायनावर प्रक्रिया करणार्या आस्थापनात (केमिलकल कंपनी) १८ जानेवारीला पहाटे ५ वाजताच्या सुमारास स्फोट झाले. या स्फोटामुळे आस्थापनाने पेट घेतला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ४ कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत. हे स्फोट इतके भयंकर होते की, ५ किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.