ठाणे येथील इंग्रजी शाळेचे शुल्क न भरल्याने परीक्षा चालू असतांना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे – शाळेचे काही मासांचे शुल्क न भरल्याने परीक्षा चालू असतांना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार ठाणे वर्तकनगर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १६ जानेवारीला सकाळी घडला. पालकांनी शाळा प्रशासनाकडून चालू असलेल्या कृत्याविषयी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. तर काही पालकांनी ऑनलाईन शुल्क भरल्याचे सांगितले. पालकांनी आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी झाली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकार्‍यांना रोखले.