चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नवे चित्रपट धोरण लवकरच लागू करणार ! – अविनाश ढाकणे, व्यवस्थापकीय संचालक, ‘फिल्म सिटी’

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन सोहळा !

उजवीकडून पहिले श्री. अविनाश ढाकणे

पुणे – देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात; मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे. असे महोत्सव तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार चांगल्या पद्धतीचे चित्रपट धोरण बनवत असून त्याद्वारे चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यास साहाय्य होईल. हे धोरण लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केले जाणार आहे, अशी माहिती ‘फिल्म सिटी’चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

ढाकणे पुढे म्हणाले, ‘‘पुणे केवळ सांस्कृतिक राजधानीच नव्हे, तर शैक्षणिक आणि ‘आयटी हब’ही आहे. चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चांगल्या पद्धतीने पुढे आणला आहे. या महोत्सवात ५१ देशांमधून ८०० हून अधिक चित्रपट रसिकांना पहाण्यास मिळणार आहेत. स्थानिक कथांवर आधारित असलेले चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.’’